केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी अमेरिका- चीनच्या तुलनेत भारतात महागाई कमी असल्याचे म्हटले आहे. कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था सुधारत असून महागाई दर कमी असल्याचे, कराड यांनी सांगितले. ते सध्या नाशिकमध्ये सुरु असलेल्या भारतीय महानुभाव पंथाच्या संमलेनाच्या समारोपासाठी ते नाशिक मध्ये आले असून, शासकीय विश्रामगृहावर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.
दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर कराड म्हणाले भाजपचे काही नेते राज ठाकरे यांना भेटले, मात्र काय समीकरण येणार माहिती नाही. तसेच पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर कराड म्हणाले की, पंकजा मुंडे नाराज नाहीत, केंद्रात सचिव पातळीवर काम करत आहेत. कालच दिल्लीत एक तास भेट झाल्याचे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा: गणेश आगमनाच्याच दिवशी मश्रूम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला, भाविक संतप्त )
मविआने अडीच वर्षात काय केले?
तसेच, केंद्र शासनाने दोन वेळा पेट्रोल- डिझेलचे दर कमी केले, याची आठवण करुन त्यांनी महागाईवर आंदोलने करणा-या विरोधकांना उत्तरं दिली. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? फक्त केंद्राकडे बोट दाखवले असे सांगून त्यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी सांभाळत राहिले अशी टीकाही कराड यांनी केली.
Join Our WhatsApp Community