आता अवयवदानासबोतच हाडेसुद्धा दान करता येणार आहेत. गेल्या आठवड्यात 57 वर्षीय मेंदूमृत महिलेने अवयव दानासोबतच हाडेसुद्धा दान केली. त्याचा कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत हाडे काढावी लागणा-या रुग्णांसाठी उपयोग केला जातो. त्यामुळे रुग्ण पुन्हा सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगू शकतात.
गेल्या काही वर्षांत हाडे दान झाल्यानंतर ती शास्त्रीयदृष्ट्या वैद्यकीय प्रक्रिया करुन जतन केली जातात. यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयात बॅंक तयार करण्यात आली आहे. यापूर्वी जी हाडे दान केली जायची ती याच बॅंकेत जतन करुन ठेवत असत.
दान केलेल्या हाडांचे करतात काय?
आपल्याकडे संपूर्ण देशात हाडांशी संबंधित शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असतात. अपघातात हाडाचा भुगा होतो. त्या ठिकाणी या दान केलेल्या हाडाचा वापर होतो. तर काही ठिकाणी हाडाचा तुकडा खराब झाल्यामुळे काढला जातो. बॅंकेत आलेल्या हाडाचे विविध आकारात रुपांतर केले जाते. त्याच्यावर शास्त्रीय प्रक्रिया करुन उणे 80 डिग्री सेल्सिअसला बॅंकेत जतन करुन ठेवले जाते.
( हेही वाचा: चक्क बाप्पा मनमाड ते मुंबई १० दिवस ये-जा करणार )
किती अवयव देता येतात?
एक मेंदूमृत व्यक्ती दोन किडन्या, यकृत, स्वादुपिंड, ह्रदय, फुफ्फुस, दोन डोळे, दोन हात आणि त्वचा दान करु शकते. मात्र यासोबतच उती पेशी, हाडेसुद्धा दान करता येतात.
Join Our WhatsApp Community