गणपती उत्सवाला संपूर्ण राज्यात आजपासून सुरुवात होत असताना पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करा, असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. अमरावतीमध्ये सामाजिक वनीकरण वाईल्ड लाईफ यांच्या संयुक्त संकल्पनेतून मातीच्या बाप्पाच्या मूर्तीचा स्टॉल लावण्यात आला. त्यावेळी बाप्पाच्या मूर्ती सोबतच एक झाड व एक कुंडी विनामूल्य दिली जात होती.
मातीची मूर्ती देणाऱ्या ग्राहकांनाच भेट
ठिकाणी जे ग्राहक गणपतीची मातीची मूर्ती खरेदी करतील, त्या ग्राहकांना एक कुंडी, एक झाड सोबत मोफत दिले जात होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व मूर्तीची विटंबना लक्षात घेता ज्यावेळी मूर्तीचे विसर्जन होईल तेव्हा त्याच कुंडीमध्ये ती माती व ते झाड लावून एक आगळा वेगळा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात यावा, असा संदेश देण्यात येत होता.
(हेही वाचा चक्क बाप्पा मनमाड ते मुंबई १० दिवस ये-जा करणार)
Join Our WhatsApp Community