नाशिकमधील सिटीलींक बसच्या चालकांनी अचानक काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. वेळेवर पगार देण्याची मागणी करत चालकांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात सिटीलींक बसच्या कर्मचा-यांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केल्याने, सामान्य नाशिककर आणि विद्यार्थ्यांचे मात्र हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
सिटीलींक बसच्या चालकांना पगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे पगारच झाले नाहीत. त्यामुळे अखेर सिटीलींक बसचे कर्मचारी आक्रमक झाले असून, वेळेवर पगार देण्याची मागणी त्यांनी केली आहे. वेळेवर पगार होत नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात संपामुळे सिटीलींक सेवा ठप्प झाली आहे. सिटीलींक सेवा ठप्प असल्याने, नाशिककरांचे हाल होत आहेत.
( हेही वाचा: भारतीय सैनिकांना फसवण्यासाठी पाकिस्तानने रचला ‘हा’ नवा डाव; वाचा सविस्तर )
पगार वेळेत देण्याची मागणी
पगार वेळेत होत नसल्याने, कर्मचारी आक्रमक झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सिटीलींक बसच्या कर्मचा-यांचे पगारच झाले नाहीत. अखरे त्यांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली असून, जोपर्यंत पगार होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका या कर्मचा-यांनी घेतली आहे.
Join Our WhatsApp Community