दाऊद इब्राहिमचा पत्ता सांगणा-याला 25 लाखांचं इनाम, तर ‘या’ कुख्यात गुन्हेगारांवरही बक्षिस जाहीर; NIA ची घोषणा

103

दाऊद इब्राहिमच्या( Dawood Ibrahim)  डोक्यावर 25 लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. तसेच छोट्या शकीलसाठी 20 लाख आणि अनिस चिकना आणि मेनन यांच्यासाठी प्रत्येकी 15 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या कुख्यात गुन्हेगारांची माहिती देण्यासाठी NIA ने या बक्षिसांची घोषणा केली आहे.

( हेही वाचा: नाशिककरांना दिलासा! प्रशासनाच्या आश्वासनानंतर Citylink बस चालकांचे आंदोलन मागे )

मुंबईमध्ये 1993 साली झालेले साखळी बाॅम्बस्फोटांबरोबरच शस्त्रास्त्रांची तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, बनावट नोटा प्रकरण, दहशतवादी हल्ले अशा अनेक गुन्ह्यांमध्ये दाऊद हा आरोपी आहे. पाकिस्तानी यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा आरोप दाऊदवर आहे. बुधवारी एनआयएने बक्षीस जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनआयएच्या एका अधिका-याने गुप्ततेच्या अटीखाली दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम ऊर्फ हजी अनीस, दाऊदचा जवळचा सहकारी जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, शकील शेख उर्फ छोटा शकील यांच्यासोबत इब्राहिम मुश्ताक अब्दुल रझाक मेनन ऊर्फ टायगर मेनन यांना पकडून देणा-यांसाठीही बक्षीसांची घोषणा केली आहे. दाऊदला पकडून देणा-याला 25 लाख, छोटा शकीलला पकडून देणा-याला 20 लाख तर अनीस, चिकना आणि मेननला पकडून देणा-याला प्रत्येकी 15 लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.