राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतना दुसरीकडे पुरातत्व विभागाकडून मंदिरातील फरशीची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील पुरातन गणेश मंदिरात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारानंतर या गावातील ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
(हेही वाचा – मनसे-भाजपमध्ये खलबतं? शेलारांनी घेतली ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंची भेट)
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर ग्रामस्थांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही विभागाकडून कोणत्याही प्रकारचे लक्ष देण्यात येत नव्हते, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही कारवाई करण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक होत ग्रामस्थांकडून तक्रार करण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिर पुरातत्त्व विभागाच्या उदासीनतेमुळे मंदिर विकासापासून वंचित आहे . त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधा ही मिळत नाहीत. पुरातत्त्व विभाग स्वत: काहीही करत नाही आणि दुसऱ्यालाही काही करू देत नाही, अशी भक्तांची भावना आहे. मंदिर परिसरातील भिंतीची डागडुजी करणे गरजेचे असताना याकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले आहे.
Join Our WhatsApp Community