फोनवर बोलताय? जरा सांभाळा! Vodafone-Idea च्या २ कोटी ग्राहकांना बसला फटका

147

व्होडाफोन आयडियाच्या कित्येक ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या ग्राहकांचा मोठा डेटा लीक झाला आहे. यामध्ये अधिकांश पोस्टपेड युजर्स आहेत. सायबर सुरक्षा कंपनी CyberX9 ने हा दावा केला आहे. व्होडाफोन-आयडियाच्या जवळपास 2 कोटी ग्राहकांचा सर्व डेटा लीक झाला आहे. व्होडाफोन आयडियाच्या (व्हीआय) या दूरसंचार प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींमुळे हे नुकसान झाल्याचा दावा CyberX9 ने केला. मात्र हा दावा व्होडाफोन-आयडियाने फेटाळून लावल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – निवडणुका, जनगणनेनंतर ST आगारात शिक्षक करणार चाकरमान्यांसाठी चहा वाटपाचं नियोजन)

समोर आलेल्या एका अहवालात असे म्हटले की, व्होडाफोन आयडियाच्या प्रणालीतील त्रुटींमुळे ग्राहकांचा कॉल डेटा रेकॉर्ड होऊन सार्वजनिक करण्यात आला. एखादा फोन कोणत्या वेळेत करण्यात आला. तो किती वेळ सुरू होता, कोणत्या ठिकाणाहून तो फोन करण्यात आला. फोन करणाऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, एसएमएस तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये असलेले सर्व कॉन्टॅक्टनंबर यांची माहिती सार्वजनिक झाली असल्याचे उघड झाले आहे.

यासह CyberX9 या अहवालात असेही म्हटले आहे की, ५.५ कोटी ग्राहकांची माहिती उघड होण्याचा सर्वाधिक धोका आहे. ज्यांनी व्होडाफोन आयडिया नेटवर्कचे कनेक्शन काढून टाकले, तसेच ज्यांनी या कंपनीचे मोबाइल कनेक्शन घेण्याची केवळ इच्छा व्यक्त केली, अशांचाही या ग्राहकांमध्ये समावेश आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.