शिवडीतील दारुखाना या ठिकाणी राहणाऱ्या महिलांचे अश्लील व्हिडीओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करणा-या टोळीचा छडा लावण्यात येलो गेट पोलिसांना यश आले आहे. ही टोळी सुमारे ५० ते ६० महिलांचे स्पॅम कॅमेऱ्यात अश्लील व्हिडीओ घेऊन सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळत होती, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अशी होती मोडस ओपरेंडी
शिवडी येथील दारुखाना हा परिसर झोपड्यांनी वेढला गेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजूर, नोकरदार वर्ग राहत आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मनपाकडून नाल्याची कामे सूरु असून या कामासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार काम करतात, या कामगारांमध्ये २१ ते २८ वयोगटातील तरुण काम करतात. ही टोळी दिवसा या परिसरात टेहळणी करते. घरात एकट्या राहणाऱ्या तरुणी, महिलांना गाठून टीव्ही केबलवाले असल्याचे सांगत केबल तपासण्यासाठी आलो असल्याचे सांगत घरात प्रवेश मिळवून घरात स्पॅम कॅमेरे बसवून निघून जात, तसेच रात्रीच्या सुमारास घराच्या छतावर चढून लहानश्या छिद्रात पेन कॅमेरे बसवून त्यात घरातील महिलांचे कपडे बदलताना तसेच आंघोळ करताना व्हिडीओ बनवत होते.
(हेही वाचा सीआयएसएफच्या जवानांकडून मुंबई पोलिसांना मारहाण)
५० ते ६० महिलांना फसवले
दुसऱ्या दिवशी त्याच निमित्ताने घरात येऊन कॅमेरे काढून घेऊन जात होते, त्यानंतर हा व्हिडीओ संबंधित तरुणी महिलांना दाखवून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळत होते, अशा प्रकारे या टोळीने सुमारे ५० ते ६० महिला आणि तरुणीचे व्हिडीओ केल्याचे समजते. या प्रकरणी काही महिलांनी शिवडी पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणी तक्रारी दाखल केल्या. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून येलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी या टोळीतील काही तरुणांना अटक केली असून त्यांच्याजवळून स्पॅम कॅमेरे जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कॅमेरात या टोळीने १०० ते दीडशे व्हिडीओ बनवले असल्याचे समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community