शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात किती जणांना मिळणार संधी? मुनगंटीवारांनी सांगितला आकडा

122

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारच्या दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये नाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

असे असतानाच आता भाजप आमदार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. नव्या मंत्रिमंडळात अजून 23 मंत्र्यांची भर पडू शकते, असे सूचक विधान मुनगंटीवार यांनी केले आहे.

(हेही वाचाः मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबणार, कारण…)

23 नव्या मंत्र्यांची भर

राज्य विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपैकी 15 टक्के आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात करता येतो. त्यानुसार राज्यात एकूण 43 जणांचे मंत्रिमंडळ तयार करता येऊ शकते. सध्या मंत्रिमंडळात एकूण 18 मंत्री आणि मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री धरुन 20 जणं आहेत. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात 43 नव्या मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. गणेशोत्सवानंतर राज्यातील नवा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महिलांना मिळणार संधी

या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांना स्थान देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच सध्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना स्थान देण्यात आले नसल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा…; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.