भाजप सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनला बांद्रा-कुर्ला संकुलातील जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्राधिकरणाने घेतला आहे. या जागेची किंमत 10 हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बुलेट ट्रेनच्या कामालाही गती मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.
बीकेसीतील मोक्याची जागा
बीएकेसीतील मोक्याची अशी 5.65 हेक्टर जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून बुलेट ट्रेनसाठीच्या जागा हस्तांतरणाला वेग आल्याचे दिसत आहे. ठाकरे सरकारने केंद्र सरकारच्या या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता.
10 कोटी किंमतीच जमीन
बीकेसीतील ही जागा अत्यंत मोक्याची असल्याने या जागेची किंमत तब्बल 10 हजार कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याठिकाणी बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
Join Our WhatsApp Community