INS VIKRANT या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचं लोकार्पण 2 सप्टेंबर रोजी करण्यात आले. केरळमधील कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाल्याने आता भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. या स्वदेशी युद्धनौकेमुळे विमानवाहू युद्धनौका बनवणा-या 6 देशांत भारताचा समावेश झाला आहे.
संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आत्मनिर्भर भारतचा नारा देण्यात आला आहे. विविध क्षेत्रांत भारत स्वावलेबी झाला असून आता आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Shaping a dream building a nation. Designed by the Indian Navy and constructed by CSL Cochin, a shining beacon of AatmaNirbhar Bharat, IAC #Vikrant is all set to be commissioned into the Indian Navy.
(Source: Indian Navy) pic.twitter.com/LpHADHTlPk
— ANI (@ANI) September 2, 2022
(हेही वाचाः खूशखबर…ऑक्टोबरमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, राज्य सरकारमध्ये 78 हजार पदांची जम्बो भरती)
13 वर्षांपासून बांधणी
संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या या युद्धनौकेचा आराखडा भारतीय नौदलाची संस्था असलेल्या वॉरशिप डिझाईन ब्यूरोच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. तर बंदरे,जहाजबांधणी आमि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने या युद्धनौकेची बांधणी केली आहे. तब्बल 13 वर्षे 2 हजार तंत्रज्ञांकडून आयएनएस युद्धनौकेची बांधणी करण्यात येत होती. या युद्धनौकेच्या बांधणीसाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
(हेही वाचाः देशाला पैसा पुरवण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा, जीएसटी संकलनात टॉप-3 मध्ये हजेरी)
काय आहेत वैशिष्ट्ये?
- आयएनएस विक्रांतवर 30 विमाने तैनात करण्यात येणार असून, त्यापैकी 20 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर असणार आहेत.
- 1 हजार 700 सैनिक तैनात करण्याची क्षमता विक्रांतमध्ये आहे.
- सध्या विक्रांतवर मिग-29 ब्लॅक पँथर लढाऊ विमाने तैनात केली जाणार आहेत.
- एफ 18 ए सुपर हॉर्नेट आणि राफेलचीही विक्रांतवर चताचणी करण्यात येणार आहे.
- आयएनएस विक्रांतची एकाच खेपेत 7 हजार 500 नॉटिकल माईल जाण्याची क्षमता आहे.
- यावरील फायटर जेटची 2 हजार मैल झेप घेण्याची क्षमता आहे.
- अँटी सबमरिन हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून शत्रूच्या पानबुड्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे.
- विक्रांतवर 14 डेक आणि 2 हजार 300 केपार्टमेंट असणार आहेत.
- दररोज 4 हजार 800 लोकांचा स्वयंपाक करण्याची व्यवस्ठा या युद्धनौकेवर करण्यात आली आहे.