जलद वाहतुकीसाठी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रशासनाने तयार केलेली बीआरटी वाहतूक यंत्रणा ब्रेकडाऊन झाली आहे. या मार्गात खासगी वाहनचालक घुसखोरी करीत असून हक्काचा मार्ग असलेल्या पीएमपीलाच या मार्गात नो एन्ट्री असल्याची स्थिती निर्माण झाल्याने पीएमपीएल प्रशासन आणि प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवाशांची गैरसोय
पुण्यात पीएमपी बससाठी येरवडा ते आपले घर या मार्गावर बीआरटी मार्ग सुरू आहे. सध्या मेट्रोच्या कामामुळे काही ठिकाणी हा मार्ग बंद तर काही ठिकाणी सुरू आहे. प्रवासांना या सेवेचा फायदा होतो. मात्र, बीआरटी मार्गात खासगी वाहनचालक घुसखोरी करत असल्याने या मार्गातून बसेस उशीरा धावत आहे.
येरवडा येथीव बीआरटी मार्गात खासगी वाहन चालकांची घुसखोरी होत असताना वाहतूक पोलीस काय करतात असा प्रश्न पीएमपी चालक तसेच प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. सायंकाळी चार वाजल्यानंतर वाघोलीवरून पुण्याकडे येणारी आणि वाघोलीकडे जाणारी एकही बस बीआरटी मार्गातून धावू शकत नाही त्यामुळे या मार्गातील थांब्यावर तासन् तास प्रवासी थांबलेले असतात.
Join Our WhatsApp Community