निर्बंधमुक्त सणात भक्तांची कृत्रिम तलावांकडे पुन्हा पाठ

120

श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर दीड दिवसांसह पुढील अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या बाप्पांच्या विसर्जनासाठी मुंबईत १५२ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु कोविड पूर्वी आणि कोविड काळात कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाला प्राधान्य देणाऱ्या भक्तांनी यंदा मात्र कोविड निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात येत असल्याने कृत्रिम तलावांकडेच पाठ फिरवली. कोविड काळात दीड दिवसांच्या एकूण विसर्जन झालेल्या मूर्तींपैंकी ५० टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्ये केले गेले होते. परंतु यावर्षी हे प्रमाणे ३५ ते ४० टक्के असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करताना भक्तांनी कृत्रिम तलावांऐवजी नैसर्गिक विसर्जन स्थळांवरच बाप्पांना विसर्जन करण्यावर भर दिला आहे.

( हेही वाचा : Whatsapp Account : जुलै महिन्यात तब्बल २३ लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन)

मुंबईत १ सप्टेंबर २०२२ रोजी दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन पार पडले. सन २०१९मध्ये केवळ ३४ कृत्रिम तलावांची निर्मिती करणाऱ्या महापालिका प्रशासनाने सन २०२० आणि २०२१मध्ये कोविड काळात कृत्रिम तलावांची अनुक्रम १७३ कृत्रिम तलावे निर्माण केली. तर २०२२ मध्ये १५२ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. यंदा दीड दिवसाच्या एकण् ६०४७३ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये २४,३८२ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये पार पडले.

New Project 30

तर २०२१मध्ये दीड दिवसांच्या एकूण ४८,७१६ विसर्जन झालेल्या मूर्तींपैंकी २४५७१ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये पार पडले. तर कोविड काळात २०२०मध्ये ४०८९५ गणेश मूर्तींपैंकी २२,८९१ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये पार पडले. तर कोविड पूर्वी म्हणजे २०१९मध्ये दीड दिवसांच्या एकूण ६१ हजार ९३० गणेश मूर्तींपैंकी केवळ १४४९० गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये पार पडले होते. त्यामुळे कोविड पूर्वी कृत्रिम तलावांकडे पाठ फिरवणाऱ्या भाविकांनी कोविड काळातील दोन वर्षांमध्ये कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करत एक प्रकारे पर्यावरण प्रेम जपण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कोविडचा आजारानंतर निर्बंधमुक्त सण साजरा होताच पुन्हा एकदा भाविकांन कृत्रिम तलावांकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळत आहे.

दीड दिवसांच्या मागील चार वर्षांतील गणेश मूर्तींचे विसर्जन

  • सन २०१९ : एकूण विसर्जन : ६१९३०, कृत्रिम तलाव : १४४९०
  • सन २०२० : एकूण विसर्जन : ४०८९५, कृत्रिम तलाव : २२८१९
  • सन २०२१ : एकूण विसर्जन : ४८७१६, कृत्रिम तलाव : २४५७१
  • सन २०२२ : एकूण विसर्जन : ६०४७३, कृत्रिम तलाव : २४३८२
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.