मुंबई पुण्यातील नवसाचे गणपती पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. हे दृश्य भारतातील व परदेशातील पर्यटकांना दाखवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग वेगवेगळे उपक्रम राबवत आहे.
( हेही वाचा : बीआरटी मार्गात पीएमपीलाच ‘नो एन्ट्री’)
प्रसिद्ध गणपती मंडळांच्या सहलीचं नियोजन
पर्यटन संचालनालय (DoT) नोंदणीकृत पर्यटकांना मार्गदर्शकांच्या सहाय्याने मुंबई आणि पुणे येथील निवडक प्रसिद्ध गणेश मंडळाच्या दर्शनाची संधी देत आहे. मुंबई येथे पर्यटक/भक्तांना फोर्टचा राजा, गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ गणपती, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा म्हणजेच मुंबईचा राजा आणि जी.एस.बी सार्वजनिक गणेशोत्सव समिती, वडाळा ही ठिकाणे या टूर अंतर्गत समाविष्ट असतील. पुणे येथील गटाला कसबा पेठेतील कसबा गणपती, नारायण पेठ येथील केसरी वाडा गणपती, गुरुजी तालीम गणपती, बुधवारपेठ येथील तांबडी जोगेश्वरी गणपती, तुळशीबाग गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी दर्शनासाठी नेले जाईल.
गणपती दर्शन सहलीची वेळ व किंमत
- मुंबई: भारतातील पर्यटकांसाठी 850/- आणि परदेशी पर्यटकांसाठी 1600/- (प्रति व्यक्ती)
वेळ: सकाळी ९ ते दुपारी २ - पुणे: भारतातील पर्यटकांसाठी 350/- आणि परदेशी पर्यटकांसाठी 550/- (प्रति व्यक्ती)
वेळ: सकाळी 9 ते दुपारी 12.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत गणेश मंडळांचे दर्शन
महाराष्ट्र पर्यटन विभागाने मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर महानगरपालिकांसोबत महाराष्ट्रातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक सहलींचे आयोजन केले आहे. हा दौरा १ सप्टेंबरला सुरू ते ७ सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमांतर्गत पर्यटकांना मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथील विविध प्रसिद्ध गणेश मंडळांमध्ये नेले जात आहे.
मुंबई मध्ये अंधेरी, कुर्ला आणि चेंबूर या तीन वेगवेगळ्या पिकअप पॉइंट्सवरून टूर सुरू होतील. मुंबई चा पेशवे (विलेपार्ले), खेरनगरचा राजा (वांद्रे), सिद्धिविनायक मंदिर (प्रभादेवी), गणेश गल्ली (लालबाग), जीएसबी गणपती (वडाळा), टिळक नगर येथील सह्याद्री मित्र मंडळ गणपती आणि चेंबूर चा राजा (सिंधी सोसायटी) या मंडळांचा समावेश आहे.
ठाणे येथील शिव समर्थ मित्र मंडळ, सार्वजनिक उत्सव मंडळ, जनजागृती मित्र मंडळ, सूर्योदय मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव आणि पानशिल सार्वजनिक गणेश मंडळांचे दर्शन पर्यटक करणार आहेत. पुणे येथील पर्यटक तुळशीबाग गणपती, गुरुजी तालीम गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, थमडी जोगेश्वरी गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, श्री कसबा गणपती आणि केसरी वाडा गणपतीच्या प्रसिद्ध मंडळांना भेट देतील.
नागपूरमध्ये पर्यटकांना टेकडी गणपती, आडासा गणेश मंदिर, अष्टदशभुज गणेश मंदिर, रामटेक आणि रेशमबाग गणपती येथे नेण्यात येणार आहे.
टूरची वेळ खालीलप्रमाणे असेल
• मुंबई: सकाळी ९.०० ते संध्याकाळी १.०० वा
• ठाणे: दुपारी ३:०० ते ६:०० वा
• पुणे: सकाळी ८.३० ते दुपारी १२.३०
• नागपूर: सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वा