दीड दिवसांच्या ६० हजारांहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन

133

श्री गणरायांचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी झाल्यानंतर १ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. गुरुवारी एकूण ६० हजार ४७३ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. मागील वर्षी कोविड काळात भाविकांनी एकूण गणेश मूर्तींपैंकी तब्बल ६० ते ६५ टक्के मूर्तींचे विसर्जन अवघ्या दीड दिवसांमध्येच पार पडले होते. त्यातुलनेत यंदा गणपती बाप्पांच्या दीड दिवसांच्या ६० हजारांहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन होत असल्याने हे प्रमाणही दरवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांमध्ये आगमन होणाऱ्या गणरायांचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येत आहे.

( हेही वाचा : वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प – मुख्यमंत्री)

श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला आहे. या दीड दिवसांच्या एकूण ६० हजार ४७३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यामध्ये २८४ सार्वजनिक आणि ६० हजार १२२ घरगुती आणि ६७ हरतालिकांचे विसर्जन पार पडले. कोविडपूर्वी अर्थातच सन २०१९मध्ये सर्वांधिक १ लाख ९६ हजार ४८३ सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यातील दीड दिवसांच्या एकूण ६१ हजार ९३० गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.

परंतु सन २०२० कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये संपूर्ण मुंबईत सार्वजनिक व घरगुती अशाप्रकारे एकूण १ लाख ३५ हजार ५१५ मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती, त्यातील दीड दिवसांच्या एकण् ४० हजार ८९५ मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. त्यानंतर कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर २०२१ मध्ये एकूण ७९ हजार ०९७ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती, त्यातील एकूण मूर्तींच्या तुलनेत दीड दिवसांच्या ६० ते ६५ टक्के मूर्तींचे अर्थात ४८ हजार ७१६ मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. त्यामुळे कोविड निर्बंध हटवण्यात आल्यानंतर प्रथमच मोकळ्या वातावरणात होणाऱ्या या गणेशोत्सवामध्ये अनेकांनी दीड दिवसांपेक्षा अधिक दिवस गणरायांचा मुक्काम अधिक वाढवण्यावर भर दिल्याचे पहायला मिळत आहे.

मागील चार वर्षांमधील प्रतिष्ठापना झालेल्या एकूण सार्वजनिक, घरगुती मूर्तीपैंकी दीड दिवसांमधील विसर्जन
  • सन २०२२ : एकूण गणेश मूर्ती :००,०००, दीड दिवसांमधील विसर्जन : ६०,४७३ मूर्ती
  • सन २०२१ : एकूण गणेश मूर्ती :७९,०९७, दीड दिवसांमधील विसर्जन : ४८,७१६ मूर्ती सन २०२० : एकूण गणेश मूर्ती :१,३५,५१५, दीड दिवसांमधील विसर्जन : ४०,८९५ मूर्ती
  • सन २०१९ : एकूण गणेश मूर्ती :१,९६,४८३, दीड दिवसांमधील विसर्जन : ६१,९३० मूर्ती
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.