तंत्रज्ञानाच्या युगात अलिकडे सर्व गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा विविध आधुनिक मशिन आता बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. रोटी मेकर, ओव्हन, डिश वॉशरमुळे किचनमधील कामाचा व्याप कमी होतो. त्यामुळे अशी उपकरणे गृहिणींसाठीही उपयुक्त ठरतात. आतापर्यंत तुम्ही प्रिंटर पाहिला असेल परंतु तुम्ही कधी असा प्रिंटर पाहिलाय का ज्यातून गरमागरमा डोसा मिळेल. सोशल मिडियावर सध्या या प्रिंटरची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या अत्याधुनिक प्रिंटरमधून डोसा बनवून मिळतो. खरेतर डोसा बनवणं हे फार कौशल्याचे काम आहे प्रत्येकालाच डोसा करणे जमेलच असे नाही, कधी डोसा तव्याला चिकटतो तर कधी डोसा बनवत असताना मध्येच डोसा फाटतो पण या अत्याधुनिक प्रिंटरमुळे तुम्ही डोसाचं पीठ मशिनमध्ये टाकून बटण क्लिक करताच तुम्हाला काही मिनिटात डोसा तयार होऊन बाहेर येईल.
ही डोसा मशिन १५ ते १६ हजार रुपयांमध्ये उपलब्ध होईल अशी चर्चा सध्या सोशल मिडीयावर रंगली आहे. सोशल मिडीवर या डोसा प्रिंटरचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Join Our WhatsApp CommunitySquare n Rectangle shaped dosas from Dosa printer 🫠
pic.twitter.com/OMeMRn1GBk— 𝑑𝑖𝑠𝑐𝑜𝑛𝑛𝑒𝑐𝑡 🚴♂️ (@iamhemuk) August 24, 2022