मुंबई महापालिकेत सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून आणखी उपायुक्त आणि सहआयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परिमंडळ चारचे सहआयुक्त विजय बालमवार यांची बदली उपायुक्त(विशेष) या पदावर करण्यात आली आहे. तर या पदावरील संजोग कबरे यांची बदली परिमंडळ चारच्या उपायुक्त पदी करण्यात आली आहे.
( हेही वाचा : आता एका क्लिकवर मिळणार डोसा; या प्रिंटरचे फोटो पाहिलेत का? )
मागील दोन आठवड्यापूर्वी परिमंडळ दोनचे उपायुक्त हर्षल काळे यांची बदली उपायुक्त(मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण)पदी करण्यात आली होती, आणि या पदावरील रमाकांत बिरादर यांची बदली परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदी करण्यात आली होती. परिमंडळ दोनच्या उपायुक्त यांच्याकडे मुंबईतील सार्वजनिक उत्सव मंडळांचे समनव्य असते. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर काळे यांची बदली केल्याने महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्यावर जोरदार टीका होत होती. खुद्द माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रशासकांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, गणेशोत्सवात खात्यांची अदलाबदल करत एका उपायुक्त व सहआयुक्त यांची बदली केल्याने हे आयुक्त बदलीचे काम करतात का असा सवाल आता मुंबईकरांना पडू लागला आहे.
सहआयुक्त बालमवार यांची बदली सहआयुक्त(विशेष) पदी करताना त्यांच्याकडे परिमंडळ चारचा पदभार सांभाळताना मागासवर्ग कक्ष) व महानगरपालिका परिक्षेत्रातील महानगरपालिका संपर्क अधिकारी (मागासवर्ग कक्ष) व परिक्षेत्रातील पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर”,पतपुरवता सुविधेची अंमलबजावणी, पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर (PM SVANIDHI) विशेष सूक्ष्म (PM SVANIDHI) विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधेची अंमलबजावणी करण्याकरिता “समन्वय अधिकारी” करण्याकरिता “समन्वय अधिकारी” या पदांचा भार कायम ठेवण्यात आला आहे
शिवाय उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) यांच्याकडे असलेले १) नियोजन खात्याचे कामकाज, २) महिला व बालकल्याण आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व ३) नियोजन, जिल्हा नियोजन व जिल्हा नियंत्रण आणि विकास परिषद (डी.पी.डी.सी.) ही कामे ‘उप आयुक्त (विशेष)’ म्हणून सहआयुक्त विजय बालमवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community