Asia Cup 2022 : रविवारी पुन्हा एकदा रंगणार भारत-पाकिस्तान लढतीचा थरार; असे असेल सुपर ४ चे शेड्युल

170

भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना घेता येणार आहे. या सामन्याची तारीख निश्चित झाली असून रविवारी ४ सप्टेंबरला महामुकाबला असेल. पाकिस्तानने हॉंगकॉंगवर विजय मिळवल्यामुळे सुपर -४ मध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लढतीचा थरार रंगणार आहे.

( हेही वाचा : मोटरमनच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; रेल्वे रूळावर लोखंडी ड्रम टाकून घातपाताचा प्रयत्न)

सुपर -४ चे संघ ठरले

आशिया कप स्पर्धेतील सुपर -४ चे संघ निश्चित झालेले आहेत. अफगाणिस्तान सुपर -४ मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आगे. ग्रुप बी मध्ये त्यांनी श्रीलंका आणि बांगलादेशला हरवलं होतं यानंतर भारताने सुपर – ४ मध्ये प्रवेश केला. भारताने ग्रुप ए मध्ये पाकिस्तान आणि हॉंगकॉंगवर विजय मिळवला. यानंतक श्रीलंकेने बांगलादेशला हरवत आणि पाकिस्तानने हॉंगकॉंगला हरवत सुपर ४ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

सुपर ४ चे शेड्युल असे असेल

  • ३ सप्टेंबर – श्रीलंका vs अफगाणिस्तान ( शारजाह)
  • ४ सप्टेंबर – भारत vs पाकिस्तान (दुबई)
  • ६ सप्टेंबर – भारत vs श्रीलंका ( दुबई)
  • ७ सप्टेंबर – पाकिस्तान vs अफगाणिस्तान ( दुबई)
  • ८ सप्टेंबर – भारत vs अफगाणिस्तान ( दुबई)
  • ९ सप्टेंबर – श्रीलंका vs पाकिस्तान ( दुबई)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.