एसटी महामंडळातील ८०० कंत्राटी चालकांवर ऐन गणेशोत्सवात बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यासाठी महामंडळाने चालकांचा वापर कमी होत असल्याचे कारण दिले आहे.
( हेही वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय खाद्य महामंडळ FCI अंतर्गत 6,096 रिक्त पदांची भरती)
कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ
एसटीच्या कायमस्वरूपी कामगारांचे २७ ऑक्टोबर २०२१ पासून आंदोलन सुरू होते या संप काळात प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामंडळाने कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली होती. एप्रिल २०२२ मध्ये संप मिटल्यावर कर्मचारी पुन्हा एकदा सेवेत रूजू होऊ लागले यावेळी कंत्राटी चालकांना मुदतवाढ देण्यात आलेली होती.
कंत्राटी चालकांना पूर्वकल्पना
आता कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे निर्देश एसटी वाहतूक महाव्यवस्थापकांनी राज्यातील विभाग नियंत्रकांनी दिले आहेत. त्यामुळे आता हे कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेतवनावरचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संपातील कर्मचारी पुन्हा रूजू झाल्यावर कंत्राटी चालकांचे काम थांबवण्यात येणार होते याची पूर्वकल्पना कंत्राटी चालकांना देण्यात आलेली होती असे एसटीतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community