ठाकरे सरकारला आणखी एक धक्का, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द

127

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातील दीड वर्षे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी ज्या मुद्यावर वाद मोठ्या प्रमाणात चिघळाला होता, तोच म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती, मात्र सरकार कोसळेपर्यंत राज्यपालांनी या यादीवर स्वाक्षरी केलीच नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी रद्द केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारची नवीन यादी 

ठाकरे सरकारने राज्यपालांकडे १२ विधान परिषद नियुक्त सदस्यांची यादी पाठवली होती. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ही यादी संमत केली नाही. या यादीवर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल वेळ लावत आहेत, कारण यामागे त्यांचे राजकारण आहे, अशी टीका तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे आणखी वाद पेटला होता. मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी ही यादी मंजूरच केली नाही. अखेर भाजपने शिंदे गटाच्या मदतीने ठाकरे सरकारला अल्पमतात आणले. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळले, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या नव्या सरकारने भगतसिंग कोश्यारी यांना ठाकरे सरकारची ‘ती’ यादी रद्द करत असल्याचे कळवले आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारची नवीन यादी लवकरच राज्यपाल कोश्यारी यांना पाठवली जाईल. त्यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील अनुक्रमे ८ आणि ४ आमदार असतील, अशी चर्चा आहे.

(हेही वाचा अजित डोभाल यांच्या मुंबई दौऱ्यामागील काय आहे कारण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.