पवई तलावाचे पर्यावरणीय मूल्यांकन : सल्लागार कंपनीची निवड

131

महापालिकेचा पवई तलाव हा अंत्यत महत्वाचा जैव विविधतेने समृध्द असा व लोकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे. त्यामुळे या तलावाच्या नैसर्गिक आणि भौतिक पर्यावरणाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत यासाठी टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा.लि. या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सल्लागार सेवेकरता सुमारे ७५ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

तलाव परिसरातील जैव विविधतेचे तसेच पवई तलावातील जलजीवांचे जतन व योग्य प्रकारे संवर्धन करणे याकरता तसेच पवई तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पर्यावरणीय पैलूंवर देखरेख करण्यासाठी आणि पवई तलावाच्या काठाची जैवविविधता वाढविण्यासाठी त्या क्षेत्रातील पर्यावरण तज्ज्ञांची समिती गठीत केली आहे. त्यानुसार सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी मागवलेल्या निविदेत चार संस्थांनी भाग घेतला होता. त्यामध्ये टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा.लि यांची निवड करण्यात आली आहे.

(हेही वाचा कल्याणमधील सुभेदार वाड्यातील असाही एक आदर्श गणेशोत्सव!)

‘या’ सल्लागारावर कोणती असेल जबाबदारी

  • पवई तलावातील विविध एजन्सींनी केलेले मागील अहवाल आणि अभ्यास संकलित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ सल्लागार समितीला मदत करणे
  • पवई तलाव आणि परिसराशी संबंधित पर्यावरणीय मापदंडांचे नमुने घेणे
  • पैंथोस, सरपटणारे प्राणी आणि इतर जैवविविधतेची आधाररेषा पार पाडणे
  • मानवरहित विमान प्रणाली द्वारे तलाव आणि त्याच्या सभोवतालचे मॅपिंग करण्याचे काम करणे आणि फोटोजिओमॅटरी वापरून उच्च रिझोल्यूशन प्रतिमा तयार करणे
  • तलावाच्या पर्यावरणाच्या गुणवत्तेच्या सध्यस्थितीचे तसेच तलावाच्या भौगोलिक परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून तलावातील पाण्याच्या लेखाचे मूल्यांकन करणे
  • दुय्यम माहिती वापरून पवई तलावाच्या भौगोलिक परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून तलावातील पाण्याचा अभ्यास करून त्याचा लेख तयार करणे आणि नवीन अभ्यासांसह ते अद्यतनित करणे
  • जलविज्ञानासंबंधित लेख आणि त्यांच्या प्रभावांचा अभ्यास करणे
  • तलाव संरक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी हाती घेतलेल्या कामांसाठी संशोधन समर्थन प्रदान करणे
  • तलाव आणि त्याच्या परिसरातील मानव प्राणी संघर्ष सोडवण्यासाठी योजना तयार करणे
  • तलावाच्या परिसरात पर्यावरणीय पर्यटनासाठी पर्यावरणपूरक संकल्पना सुचविणे
  • तलावतील मगरी आणि इतर प्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी उपाय
  • स्थलीय आणि जलीय जैवविविधतेचे मूल्यांकन करणे
  • पुनरुज्जीवनाचे पर्याय तयार करणे आणि त्यांचा तलाव आणि सभोवतालच्या पर्यावरणीय गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करणे
  • बाष्पीभवन हानी आणि इतर जलस्रोतांशी त्याचा संबंध यांचे मूल्यांकन करणे

तलावाच्या काठची जैवविविधता वाढवण्यासाठी सल्लागार समिती

  • डॉ. राकेश कुमार, पर्यावरण शास्त्रज्ञ. (सी.एस.आय.आर-नीरी) (अध्यक्ष)
  • डॉ. दिपक आपटे, पर्यावरण विशेषज्ञ आणि सागरी जीवशास्त्रज्ञ (सदस्य)
  • डॉ. प्रमोद साळसकर, पवई तलावावरील पर्यावरण तज्ञ (सदस्य)
  • जलअभियंता मुंबई महानगरपालिका (सदस्य सचिव)
  • तसेच, मगरी आणि जलचर यांसारख्या सरपटणा-या प्राण्यांच्या क्षेत्रातील तज्ञ
  • केदार भिडे (वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, हर्पेटोलॉजिस्ट) यांची देखील पवई तलावातील
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.