अशोक चव्हाण-फडणवीसांच्या गाठीभेटी आणि राणेंचे सूतोवाच

189

सध्या राजकारणात कोण कोणासोबत जाईल, याची सुतराम शक्यता वर्तवता येत नाही. अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी समविचारी भाजपाला सोडून थेट एकेकाळच्या हाडवैरी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली. आता शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. आता भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटी गाठी वाढलेल्या आहेत, अशा वातावरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यासंबंधी धक्कादायक सूतोवाच केले आहेत.

शिल्लक काँग्रेस वाटून घेऊ 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या निवासस्थानी जावून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसमधील एका मोठ्या नेत्यासह पक्षातील आमदारांचा एक गट सरकारमधील भाजपत जाणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावर बोलताना नारायण राणे यांनी, भाजप थेट कृती करते. त्याचबरोबर शिल्लक राहिलेली काँग्रेस वाटून घेऊ, असे नारायण राणे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्ष असलेले सरकार घरी पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला, तो मला खूपच आवडला, असे राणे म्हणाले तर मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीतील अनुभवांबद्दल चर्चा झाली, ही सदिच्छा भेट होती. जुन्या आठवणी निघाल्या. मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीतील अनुभवांबद्दल चर्चा झाली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. काँग्रेसमधील एक गट सरकारमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यासंदर्भात, काँग्रेसबद्दल बोलत नाही. सभागृहात बोललो आहे. त्यांची जी काय फरफट सुरू आहे,  ती आपण पाहत आहे, कुणावर टीका करण्याचा माझा स्वभाव नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा कल्याणमधील सुभेदार वाड्यातील असाही एक आदर्श गणेशोत्सव!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.