वाळूज औद्योगिक नगरीतील मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर बी 12 या कंपनीत प्रोडक्शन विभागाच्यावतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोटर सायकलचे चेसिस, मोटर सायकलचे पार्ट असेम्ब्ली बनवण्याचे काम चालते.
100 रोबोट मोटर सायकलच्या चेसिसला वेल्डिंग मारण्याचे काम करतात
या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोटर सायकलच्या चेसिसला वेल्डिंग मारण्याचे काम रोबोटद्वारे केले जाते, एकूणच 100 रोबोट मोटर सायकलच्या चेसिसला वेल्डिंग मारण्याचे काम करतात. काम सुलभ करण्याकरिता रोबोटच्या तंत्रज्ञानाचा वापर मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मोठ्या दिमतीने केल्याने कंपनीच्या उत्पादनाचा दर्जा आणि कामाचा वेळही सुखकर झाला आहे. आपल्या कंपनीची गुणवत्ता कामाची वेळ सुलभ करण्यास रोबोट महत्वपूर्ण हातभार लावत असल्याने कंपनीत प्रतिष्ठापणा केलेल्या गणरायाची आरतीही चक्क रोबोटद्वारे केली जात आहे. बाप्पांची आरती करणारा रोबोट औद्योगिक वाळूज नगरीत कुतूहलाचा विषय ठरत आहे.
(हेही वाचा अवघ्या १०-१५ दिवसांत खेतवाडीतील १५-२० फुटांच्या गणेशमूर्ती कशा उभ्या केल्या?)
Join Our WhatsApp Community