गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने ४,५,६ आणि ९ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. यातून भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय व निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दि. ४, ५, ६ आणि ९ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड व बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय व निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सुट देण्यात आली आहे. pic.twitter.com/CvytOc1KFy
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 3, 2022
विसर्जन मिरवणुकांमध्ये सुरळीत पाडण्यासाठी…
३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत राज्यभर गणेशोत्सव साजरा होत आहे. मुंबईत देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सवात साजरा केला जात आहे. ४ सफ्टेंबर रोजी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. तर ५ सप्टेंबर रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन, ६ सप्टेंबर रोजी सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन आहेणार आहे. तर ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. या विसर्जनाच्या दिवशी वाहतूक आणि गणपती मिरवणुकांना वाहतुकीची समस्या भेडसावू नये यासाठी मुंबई पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे.
(हेही वाचा अवघ्या १०-१५ दिवसांत खेतवाडीतील १५-२० फुटांच्या गणेशमूर्ती कशा उभ्या केल्या?)
Join Our WhatsApp Community