अमेरिकेत विमान अपहरणाने उडाली खळबळ 

124

अमेरिकेत शनिवारी, ३ सप्टेंबर रोजी ७/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे स्मरण झाले आहे. अमेरिकेत पुन्हा विमान अपहरणाच्या घटनेने खळबळ उडाली. अपहरणकर्त्याने थेट पोलिसांना धमकी दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ परिसरातील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व नागरिकांना त्या भागापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.

९ आसनी विमानाचे अपहरण केले 

अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये विमानाच्या पायलटने विमान धडकवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. पायलटने ९ आसनी विमानाचे अपहरण केले आणि तुपेलो विमानतळावरून उड्डाण केले. यानंतर तासभर तो शहरातच विमान उडवत होता. माहिती मिळताच पोलीस आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अनेक दुकाने रिकामी करण्यात आली. स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजता ही घटना घडली. वॉलमार्ट स्टोरला धडक देऊन विमान क्रॅश करू, अशी धमकी त्या पायलटने दिली होती. पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तुपेलो पोलिस विभागाकडून सर्व नागरिकांनी सजग आणि जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

(हेही वाचा हिंदुत्वामध्ये हाती कमळ असलेल्या स्त्रिला महालक्ष्मी म्हणतात, कमळाबाई नाही!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.