मध्य रेल्वेने सर्व स्थानके, विभाग, डेपो, कार्यशाळा, शेड इत्यादी भंगारमुक्त करण्यासाठी आणि “झिरो स्क्रॅप मिशन”च्या दृष्टीने अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत भंगार वाढले
चालू वर्षात एप्रिल-ऑगस्ट 2022 या कालावधीत मध्य रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून 175.98 कोटी कमाईची नोंद केली आहे, जी मागील वर्षीच्या ऑगस्ट 2021 कालावधीत प्राप्त झालेल्या 137.48 कोटी महसुलाच्या तुलनेत 35.19% अधिक आहे. मध्य रेल्वेने मिळवलेला 175.98 रु. कोटीचा भंगार विक्री महसूल हा एप्रिल-ऑगस्ट या कालावधीतील भंगार विक्रीतून निर्माण झालेला आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे.
(हेही वाचा अवघ्या १०-१५ दिवसांत खेतवाडीतील १५-२० फुटांच्या गणेशमूर्ती कशा उभ्या केल्या?)
“झिरो स्क्रॅप मिशन” साठी सर्वोपरी प्रयत्न
अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे म्हणाले की, भंगाराच्या विल्हेवाटीने केवळ महसूलच मिळत नाही, तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. ते म्हणाले की, रेल्वेमधील विविध ठिकाणच्या भंगार साहित्याचा शोध घेऊन मध्य रेल्वे “झिरो स्क्रॅप मिशन” साठी सर्वोपरी प्रयत्न करत आहे.
Join Our WhatsApp Community