दहशतवादी गटांशी संबंध असलेल्या एकाला मुंबईतून, तर दुसऱ्याला प.बंगालमधून अटक

129

पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) मदतीने मुंबईतून एकाला ताब्यात घेतले आहे. यामध्ये सद्दाम हुसेन खान (३४) याला मुंबईच्या निर्मल नगरमधून अटक केली आहे. यासोबतच समीर हुसेन शेख (३०) याला पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे. हे दोघे प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते आणि जिहादी कार्यकर्त्यांमध्येही सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – वाळूज औद्योगिक नगरीत चक्क रोबोट करतो बाप्पाची आरती)

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष तपास पथकाने मुंबईतील (वांद्रे) येथून बंदी घातलेल्या जिहादी दहशतवादी संघटना आणि अत्यंत कट्टरतावादी संघटनेशी नियमित संपर्कात असल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालच्या एसटीएफ आणि गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) हे दोघेही बऱ्याच गुन्ह्यांच्या तपासात सापडले. त्यांनी वारंवार आपले लपण्याचे ठिकाण बदलले आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ते फिरत होते.

अखेर त्यांच्या मोबाइल फोनच्या लोकेशन्सचा मागोवा घेतला. त्यावेळी ते मुंबईत लपून बसल्याचे समजले. त्याआधारे पोलिसांनी ताबडतोब महाराष्ट्र एटीएसशी संपर्क साधला. त्यानंतर शनिवारी एसटीएफ आणि एटीएसच्या संयुक्त कारवाईतून दोघांना पकडण्यात आले. दोघांच्या ताब्यातून रोख रक्कम, लॅपटॉप, अनेक मोबाईल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.