…नाहीतर आता वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई!

146

वाहतुकीच्या नियमांचा भंग झाल्यास तुमच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच आता वाहतूक पोलीस प्रोटोकॉलचा भंग केल्यास कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत के सारंगाल यांनी या संबंधित परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी खासगी वाहन किंवा त्यांच्या खासगी मोबाईल न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेचं पालन न झाल्यास वाहतूक पोलिसांनाच दंडात्मक कारवाईला सामोरं जावे लागणार आहे.

(हेही वाचा – दहशतवादी गटांशी संबंध असलेल्या एकाला मुंबईतून, तर दुसऱ्याला प.बंगालमधून अटक)

काय आहेत परिपत्रकात केलेल्या सूचना?

  • वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर करू नये
  • जर कोणी खासगी मोबाईला वापर केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार
  • काही अधिकारी आणि अंमलदार ई चलान मशिनद्वारे कारवाई न करता आपल्या खासगी मोबाइलवर फोटो काढतात अशा स्वरुपाच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी फक्त चलान मशिनद्वारेच फोटो काढणे अपेक्षित आहे. असं न झाल्यास संबंधित पोलिसांवर कारवाई होणार.
  • वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो किंवा व्हिडिओ करून काही कालावधीनंतर ई चलान मशिनमध्ये फोटो अपलोड करतात. तसेच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात. त्यामुळे गाड़ी कोणती आहे, हे ओळखणे अशक्य होते.
  • पोलीस अधिकारी अंमलदार यांचेकडील ई चलान मशिनबाबत काही समस्या, अडचणी असल्यास तशी तक्रार द्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.