लद्दाखमध्ये उभारणार देशातील पहिले खगोल निरीक्षण केंद्र

130

देशातील पहिले खगोल निरीक्षण केंद्र लद्दाखमध्ये उभारले जाणार असून हा प्रकल्प पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे लडाखचे नायब राज्यपाल आर.के. माथूर यांच्या भेटीनंतर ही माहिती दिली.

(हेही वाचा – …नाहीतर आता वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई!)

याबाबत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हाती घेतलेल्या आगळ्या वेगळ्या आणि अशा स्वरूपाच्या पहिल्याच उपक्रमांतर्गत हे केंद्र उभारले जातेय. लद्दाखमध्ये प्रस्तावित डार्क स्काय रिझर्व, लडाखमधील हानले येथे उभारले जाणार असून ते चांगथांग वन्य जीव अभयारण्याचा भाग असेल. त्यामुळे भारतामधील खगोल पर्यटनाला चालना मिळेल.

तसेच ते ऑप्टिकल, इन्फ्रा-रेड आणि गॅमा-रे टेलिस्कोपसाठीचे जगातील सर्वात उंचीवरच्या स्थळांपैकी एक असणार आहे. प्रस्तावित डार्क स्पेस रिझर्व सुरु करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश प्रशासन, लडाख स्वायत्त पहाडी विकास परिषद (एलएएचडीसी) लेह आणि भारतीय खगोल भौतिक शास्त्र संस्था (आयआयए) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी झाल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.ते म्हणाले, स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध उपक्रम आयोजित केले जातील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.