केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेशोत्सवासाठी मुंबईत येत असल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. यावेळी राजकीय बैठका नक्कीच होणार असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा देखील करणार असल्याचे सांगितले जात आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही ते मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेतील, असेही सांगितले जात आहे. दरम्यान, आजच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीचीही चर्चा देखील रंगली आहे. या दौऱ्यात शाह हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि लोकप्रिय गणेश मंडळांपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाला भेट देणार आहेत, तसेच भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठीही घेणार आहेत, असे आणखी एका भाजप नेत्याने सांगितले.
(हेही वाचा – अमित शाह मुंबई दौऱ्यात घेणार गणेश दर्शन! भाजपा पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज म्हणजेच रविवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अॅडव्हायझरी सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरी सुचनेनुसार, 4 आणि 5 सप्टेंबर रोजी पूर्वनियोजित VVIP दौऱ्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये रस्त्यांवरील वाहतूक संथ राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले की, 4 सप्टेंबर रोजी सहार, वांद्रे (पूर्व), वरळी सी लिंक, हाजी अली, केम्प्स कॉर्नर, मलबार हिल आणि बाबुलनाथ येथे रात्री 9 ते 10.30 या वेळेत वाहतुकीचा वेग कमी असणारआहे. यासह अधिक माहिती देत मुंबई वाहतूक पोलिसांनी एक ट्वीट केले आहे.
Due to a pre-scheduled VVIP visit on 4th and 5th September, 2022 traffic movement on the roads in following areas will be slow.
Citizens kindly plan you commute accordingly. pic.twitter.com/PZDZkQI9Qv
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 3, 2022
यासह सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत वरळी सी लिंक आणि लीलावती जंक्शनपासून मलबार हिल, केम्प्स कॉर्नर, बाबुलनाथ, हाजी अली, महालक्ष्मी रेसकोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन, लालबाग, परळ, लोटस जंक्शन, वरळी डेअरी यासारख्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community