सोलापूरच्या करमाळ्यात मालगाडीचं इंजिन घुसलं थेट शेतात!

209

सोलापूरच्या करमाळ्यात एका मालगाडीचा अपघात झाला. मालगाडीचे इंजिन थेट शेतात घुसल्याचा व्हिडिओ समोर आले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालगाडीचे नुकसान झाले असून मालगाडीचे डबेही रेल्वे रूळावरून घसल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्हातील करमाळा तालुक्यातील केम गावाजवळ माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेचा अपघात झाला होता. मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट शेतात घुसल्याचे पाहायला मिळाले. रविवारी सकाळच्या दरम्यान केम या गावाजवळील शेतात सिमेंट भरलेल्या रेल्वेचे इंजिन रूळ सोडून शेतात उतरले.

(हेही वाचा – अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत मुंबई पोलिसांकडून ट्वीट, कशी असणार वाहतूक व्यवस्था?)

रेल्वेच्या दोन इंजिनांसह डबे घसरून शेतात

मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा येथील एका रेल्वे ट्रॅक वरील रेल्वेचे दोन्ही इंजिन व दोन डबे रेल्वे ट्रॅक सोडून अचानक घसरले, त्यामुळे काहीवेळ रेल्वेलाईन बंद होती. रेल्वे अचानक घसरल्याने रेल्वेचे दोन्ही इंजिन थेट केम येथील शेतकरी रवी खाणट यांच्या शेतात घुसले.

सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसून रेल्वेरुळाचे मात्र नुकसान झाले. सोलापूर-पुणे हा दुहेरी रेल्वे ट्रॅक असून या ट्रॅक वरील एका ट्रॅकवरुन जाणारी रेल्वे काल शनिवारी रात्री केम जवळ घसरली व खाली गेली, परंतु रेल्वे विभागाने आज, रविवारी पहाटे 3 वाजता तातडीने यंत्रणा सज्ज करून क्रेनद्वारे हे रेल्वेचे दोन्ही इंजिन पुन्हा रेल्वे ट्रॅकवर लावून पूर्ववत करण्याचे काम चालू आहे. यासाठी 3 ते 4 दिवस लागू शकतात. परंतु काही वेळ एक रेल्वे ट्रॅक बंद होता, त्यामुळे ठराविक गाड्यांच्या वेळेत बदल झाला होता.

बघा व्हिडिओ?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.