तिरुपती हे मंदिर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता मात्र तिरुपती मंदिर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरले आहे. भक्ताला सेवा देण्यासाठी विलंब केल्याने आता तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तामिळनाडूच्या ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
….नाहीतर 50 लाख रुपये भरपाई द्या
ग्राहक न्यायालयाने तामिळनाडू येथील तिरुमला तिरुपती देवस्थानला भक्ताला 14 वर्षे वाट पाहायला लावल्याने 50 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, भक्ताला वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देण्यात यावी किंवा वर्षभरात 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी. एका भक्ताने तिरुपती देवस्थानाविरोधात ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला होता, असा खटला दाखल करण्याची ही पहिलीची वेळ आहे.
( हेही वाचा: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर ‘विराट’ला आठवला ‘धोनी’, म्हणाला… )
काय आहे नेमके प्रकरण ?
के. आर. हरी भास्कर या भक्ताने वस्त्रालंकार सेवेसाठी 14 वर्षांआधी म्हणजे 2006 साली बुकिंग केली होती. कोरोनाकाळत तिरुपती मंदिर 80 दिवसांसाठी बंद होते. त्यामुळे मंदिरातील वस्त्रालंकारासह सर्व सेवा बंद होत्या. त्यानंतर या देवस्थानाने भक्त हरी भास्कर यांना अधिकृत निवेदन पाठवत विचारणा केली होती की त्यांना VIP ब्रेक दर्शनासाठी नवीन स्लाॅट हवा आहे की परतावा. यावर भास्कर यांनी देवस्थानाला वस्त्रालंकार सेवेसाठी कोणत्याही तारखेची बुकींग देण्यास सांगितली. परंतु यावर उत्तर देताना, देवस्थानाने नवीन तारीख देता येणार नसल्याचे सांगितले आणि परतावा घेण्यास सांगितला. त्यानंतर भक्त के. आर. हरी भास्कर याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने भक्ताच्या बाजूने निर्णय देत, नवीन तारीख द्यावी अथवा वर्षभरात 50 लाख रुपयांची भरपाई भक्ताला द्यावी, असे आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community