मदरशात मुलाचे लैंगिक शोषण, शिक्षकाला अटक

137

तेलंगणातील हैदराबादच्या संतोषनगर परिसरातल्या मदरशातील बालकाचे लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर 21 वर्षीय मदरशातील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले होते. शिक्षकावर गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी मदरसा शिक्षकाने एका 14 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले. पीडित बालकाच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपीच्या विरोधात पाॅक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत मदशांमध्ये असे प्रकार वाढीस लागल्याच्या तक्रारी येत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने गेल्या 31 ऑगस्ट रोजी मदशांच्या सर्वेक्षणाची घोषणा केली आहे. मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आवश्यकतेनुसार हे सर्वेक्षण केले जाईल, असे अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी सांगितले आहे. दरम्यान, सरकारने 5 ऑक्टोबरपर्यंत अनोळखी मदरशांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), मूलभूत शिक्षा अधिकारी (बीएसए) आणि जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांचे पथक तयार करण्यात येणार आहे.

( हेही वाचा: भक्ताला विलंबाने सेवा दिल्याने, तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.