नॅशनल टेस्टिंग एजन्सीने CSIR UGC NET परीक्षा २०२२ चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या परीक्षेला बसणारे सर्व उमेदवार csirnet.nta.nic.in या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकतात.
( हेही वाचा : देशातील पहिले ‘नाईट स्काय अभयारण्य’!)
CSIR UGC NET २०२२ परीक्षा केव्हा होणार?
- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार ही परीक्षा १६ सप्टेंबर २०२२ ते १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत घेतली जाईल. देशभरातील विविध केंद्रांवर परीक्षा सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या दोन सत्रांमध्ये घेतली जाईल.
- १३ सप्टेंबर रोजी या परीक्षेची प्रवेशपत्रे जारी केली जातील तसेच परीक्षा केंद्रांच्या शहरांची यादी १० सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी csirnet.nta.nic.in ला भेट द्यावी.
- प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करून लॉग इन करावे लागेल.
- CSIR UGC NET 2022 प्रवेशपत्राशी संबंधित लिंकवर क्लिक करा आणि प्रवेशपत्राची प्रिंट काढा.