ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकली आहे. त्यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. लिझ ट्रस मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लिझ ट्रस यांना 81 हजार 326 आणि ऋषी सुनक यांना 60 हजार 399 मते मिळाली. थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.
( हेही वाचा : सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार – मुख्यमंत्री )
पंतप्रधान निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपले. निवडणूक निकालापूर्वी आलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्या मागे असल्याचे सांगण्यात आले होते. लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठीच्या शर्यतीत भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांचा पराभव केला. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या सरकारमधील अनेक घोटाळे आणि मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपद सोडण्याची घोषणा केली आणि नवीन पंतप्रधान पदासाठी जुलैमध्ये निवडणूक सुरू झाली. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेली चढाओढ अखेर संपली असून ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळाला.
निवडणूक जिंकल्यानंतर लिझ ट्रस म्हणाल्या की, त्या एक नवीन योजना मांडणार आहेत. लिझ ट्रस यांनी दावा केला की, कोरोना महामारीनंतर कर कमी करण्यासाठी आणि ब्रिटिश अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्या एक योजना घेऊन येत असून ऊर्जा संकट आणि एनएचएसवर काम करेल. आम्ही सर्वजण आपल्या देशासाठी काम करू असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community