मोदी सरकार दिल्लीतील राजपथाचे नाव बदलणार!

125

दिल्लीतील राजपथाचे नाव मोदी सरकार बदलण्याच्या तयारीत आहे. त्याचे नाव कर्तव्यपथ असे करण्याचा निर्णय घेणार आहे. मोदी सरकार सेंट्रल व्हिस्टा लॉनचेही नाव बदलण्याच्या तयारीत आहे.

विजय चौक ते इंडिया गेट या संपूर्ण मार्गाचे उद्घाटन करणार 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या रस्त्याला कर्तव्यपथ असे नाव दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विजय चौक ते इंडिया गेट या संपूर्ण मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. राजपथाच्या बाजूने सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये राज्यांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल, लॉन, ग्रॅनाइट वॉकवे, वेंडिंग झोन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा असेल. इंडिया गेट ते मानसिंग रोडपर्यंतच्या उद्यान परिसरात खाण्याची परवानगी दिली जाणार नाही. सद्य:स्थितीतील संसद भवन तसेच विविध सरकारी खात्यांची कार्यालये, मंत्र्यांची दालने, मंत्रालय, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांची निवासस्थाने हे सर्व अपुरे पडत आहे. नव्या संसद भवनासह संपूर्ण परिसराचे नव्याने बांधकाम करण्याचे ठरले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली.

(हेही वाचा ‘सेक्युलर’ देशात हिंदूंच्या उत्सवांसाठी मुसलमानांच्या अनुमतीची गरज काय? – गायत्री एन्

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.