परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या झाल्याने खळबळ

164

परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही हत्या करण्यात आली आहे.  परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा खून करण्यात आला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सध्या पुढील तपास सुरु आहे. या हत्येनंतर परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

( हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन )

किरकोळ वादातून हत्या

सचिन पाटील हे मनसेचे शहर प्रमुख होते. किरकोळ वादातून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खरंच या हत्येमागे किरकोळ कारणं होतं की आणखी काही वाद होता, याचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. सचिन पाटील यांच्या मित्रानेच हे हत्याकांड रचलं, अशीही शंका पोलिसांना आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.