आनंदाची बातमी! नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला भारतातही परवानगी

170

गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने जगभरात कहर केला आहे. अद्याप कोरोना महामारी पूर्णतः नाहिसी झाली नसून कोरोना लस कशी फायदेशीर ठरेल याकरता प्रत्येक देश प्रयत्नशील आहे. अशातच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला परवानगी देणारा चीन हा जगातील पहिला देश ठरल्यानंतर आता भारतातही बहुप्रतिक्षित नाकावाटे दिली जाणारी लस तयार झाली असून तिच्या वापरालाही परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकला DGCI कडून नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना महामारीच्या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. नाकावाटे दिली जाणारी ही भारतातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस असणार आहे.

(हेही वाचा – नाकावाटे दिल्या जाणाऱ्या Covid-19 लसीला अखेर परवानगी; हा देश ठरला जगात पहिला)

कोणतेही इंजेक्शन हे दंडात दिले जाते. यामधील औषध थेट स्नायूमध्ये जाणं आवश्यक असते. मात्र ही नाकावाटे दिली जाणारी लस स्नायूत देण्याची गरज नाही. नाकामध्ये त्याचे दोन थेंब टाकून ही लस देण्यात येते. नाक चोंदल्यास जो स्प्रे वापरला जातो, त्याप्रमाणेच ही लस देण्यात येणार आहे. भारत बायोटेकने घेतलेल्या चाचण्यांमध्ये या लसीला कोणतेही दुष्परिणाम न झाल्याचे समोर आले आहे.

नेझल लसीचे फायदे

  • इंजेक्शनपासून सुटका
  • नाकाच्या आतील भागात प्रतिकारशक्ती निर्माण करून, श्वसन संक्रमणाचा धोका कमी होणार
  • इंजेक्शन्सपासून मुक्ती मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज नाही
  • मुलांना लसीकरण करणे सोपे होणार
  • उत्पादन सुलभतेमुळे जगभरातील मागणीनुसार उत्पादन आणि पुरवठा शक्य
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.