तुमच्याकडे चांगल्या व्यवसाय संकल्पना असल्या तरीही त्यासाठी फंडिंग मिळवणे हे बरेच कठीण काम असते. कोणत्याही स्टार्टअपसाठी दोन प्रकरांनी निधी उभारला जाऊ शकतो.
भागभांडवल (इक्विटी) आणि डेट फंड
जेव्हा एखादा गुंतवणूकदार भागभांडवलात पैसे लावतो, तेव्हा त्याची प्री-सीड व सीड स्टेज असते. प्री- सीड ही प्रारंभिक अवस्था आहे. यात संकल्पनेला आकार मिळतो. प्रोटोटाईप तयार होते. यात गुंतवणूकही कमी असते. साधारणपणे स्टार्टअपचा संस्थापक भागीदार बनवण्याऐवजी स्वत:च पैसे लावणे पसंत करत असतो. त्यासाठी तो एक बूट स्ट्रेपिंग करतो किंवा क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून निधी उभा करतो. फंडिगचे हे गणित समजून घेऊ या.
बूट स्ट्रेपिंग
व्यवसाय चालवण्यासाठी स्वत:च्या पैशाचा वापर केला जातो. तेव्हा त्यास बूट स्ट्रेपिंग म्हटले जाते. व्यक्तिगत बचत, कमी अथवा विना व्याजाचे क्रेडिट कार्ड अथवा आपले घर तारण आणि क्रेडिट लाईन याद्वारे हा पैसा येतो.
सीड स्टेज
व्यवसाय पुढे वाढू लागतो, तेव्हा तो सीड स्टेजला येतो. या टप्प्यात उत्पादनाचे प्रोटोटाईप तयार होते. बाजारात मागणीची पडताळणी केली जाते. या टप्प्यात इन्क्युबेटर, एंजेल इन्व्हेस्टर, सरकारी योजना, कर्ज वा क्राउड फंडिंगचा वापर केला जातो.
मोठ्या निधीची गरज
व्यवसाय वाढल्यानंतर मोठ्या निधीची गरज भासते. यास सीरीज ए फंडिंग म्हणतात. या टप्प्यात व्हेंचर कॅपिटल फंड्स, व्हेंचर डेट फंड्स अथवा बॅंकांचे कर्ज यांचा वापर केला जातो. संकल्पना यशस्वी झाल्यानंतर फंडिंग बी, सी, डी आणि ई सिरीजमध्ये जाते. यापेक्षाही अधिक यशस्वी स्टार्टअप आयपीओच्या टप्प्यात जाते.
( हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन )
महिलांनी असा घ्यावा लाभ
स्टार्टअप फंडिंगमध्ये महिलांसाठी विशेष वुमन अॅक्सिलेटर प्रोग्राम आहे. त्यात महिलांना अनुदान व वित्तीय साहाय्य केले जाते.
Join Our WhatsApp Community