मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी, सकाळी ६.३५ वाजता ट्रॅकमन हीरा लाल आणि मिथुन कुमार हे डाऊन फास्ट मार्गावर कर्तव्यावर असताना त्यांना पत्रीपुल, कल्याण जवळील ५१-१४-५१/१६ किलोमीटरवर रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याचे दिसले. त्याचवेळी ट्रेन क्र. २२१०५ इंद्रायणी एक्स्प्रेस वेगात येत असल्याचे पाहून, मिथुन कुमार (वय २३) यांनी ताबडतोब लाल सिग्नल देऊन जवळ येत असलेल्या ट्रेनकडे धाव घेतली आणि वेळेवर ट्रेन थांबवली, तर हीरा लाल (वय २६) यांनी घटनास्थळ संरक्षित केले. सकाळी ७.१५ वाजता मार्ग पूर्ववत करून हा मार्ग सुरू करण्यात आला आणि वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचे काम पूर्ण झाले. ट्रॅकमन यांच्या तत्पर आणि सतर्क गस्त आणि कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. त्यांच्या कर्तव्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
(हेही वाचा भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र…’ बारामती सुद्धा महाराष्ट्रातच येते, फडणवीसांचे सूचक विधान)
Join Our WhatsApp Community