कोकणात पावसाचा जोर वाढणार, अनंतचतुर्दशीला पाऊस धो-धो बरसणार

140

कोकणात पावसाला आता जोर आला असून, अनंतचतुर्दशीच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण कोकणाला तसेच मध्य महाराष्ट्राला पावसासाठी गुरुवारपासून मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. चंद्रपूर, गडचिरोलीला अतिवृष्टीसाठी शुक्रवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात वा-यांचा वेग वाढणार

राज्यात सोमवारपासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्येही वा-याचा वेग ३० ते ४० किलोमीटर ताशी दिसून येईल. सोमवारपासून सुरु होणा-या वा-याचा वेगाचा प्रभाव दक्षिण कोकणात मंगळवारपर्यंत दिसेल. नाशिकला बुधवार आणि गुरुवारी वा-याचा वेग वाढलेला असेल. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी बीड, हिंगोली, नांदेड, लातूर तसेच औरंगाबादमध्ये गुरुवारपर्यंत वा-याचा प्रभाव कायम राहील.

(हेही वाचा ‘आता बोलताना मुख्यमंत्रीपदाचा मास्क तोंडावर नसेल’, दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे विधान)

गुरुवारपासून पाऊस सक्रीय होणार

गुरुवारपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात होईल. मुंबई, ठाणे, पालघर, तसेच नंदुरबार, धुळे आणि जळगाव वगळता राज्यात पाऊस सक्रीय होईल. रायगडमध्ये गुरुवारी मुसळधार तर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गुरुवारी अतिवृष्टी होईल. तिन्ही जिल्ह्यांत शुक्रवार आणि शनिवारी अतिवृष्टी होईल. जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूरात शुक्रवारी मुसळधार पाऊस राहील. जळगाव वगळता इतर जिल्ह्यांत शनिवारी अतिवृष्टी होईल. कोल्हापूर सातारा आणि औरंगाबादमध्ये शुक्रवार आणि शनिवारी अतिवृष्टी होईल. शुक्रवारी जालन्यात मुसळधार तर परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये अतिवृष्टी होईल.

विदर्भात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट

विदर्भात शुक्रवारपर्यंत मेघगर्जना आणि विजांचा गडगडाट सुरु राहील. चंद्रपूर, गडचिरोलीत गुरुवारी मुसळधार पाऊस होईल. वर्धा व यवतमाळमध्ये शुक्रवारी  तर वाशिममध्ये मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट राहील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.