गणपती विसर्जन २०२२ निमित्त प्रवाशांच्या सोयासाठी मध्य रेल्वे दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी (९/१०.९.२०२२ मध्यरात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
( हेही वाचा : बंद दाराआड आम्ही काहीच करीत नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना ठाकरे शैलीत टोला )
या गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे…
मेन लाईन – अप स्पेशल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून ००.०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०१.३० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.०० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून ०२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
मुख्य लाईन – डाउन स्पेशल
कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.१० वाजता पोहोचेल.
ठाणे विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल.
कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ४.५५ वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन – अप स्पेशल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.२० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०५ वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन – डाऊन स्पेशल
पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल.
पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ४.०५ वाजता पोहोचेल.
Join Our WhatsApp Community