मढ मार्वेमधील ‘त्या’ वादग्रस्त स्टुडिओप्रकरणी उपायुक्त काळे यांची चौकशी समिती; चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आयुक्तांच्या सूचना

167

मालाडमध्ये नियमबाह्य उभारण्यात आलेल्या वादग्रस्त स्टुडिओ प्रकरणी आता महापालिकेने चौकशीचे आदेश दिले असून यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे. उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीस समिती महापालिकेने या स्टुडिओ कशाप्रकारे आणि कशी परवानगी दिली होती, त्यात नियमांचे उल्लंघन झाले किंवा कसे याची चौकशी करणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी उपायुक्त हर्षद काळे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवली असून काळे यांना पुढील चार आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.त्यामुळे या चौकशी अहवालात नक्की कोण दोषी ठरतेय आणि कुणावर ठपका बसतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

( हेही वाचा : अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन : अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी विसर्जन स्थळांची केली पाहणी)

New Project 14 1

मालाड-मार्वे येथे १ हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळा झाला असल्याचा आरोप माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यावेळी सोमय्या यांनी माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावरही आरोप करत, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून अस्लम शेख यांनी स्टुडिओचे बांधकाम केले असल्याचे म्हटले होते. सोमय्यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी करत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व महापालिकेला याबाबत कठोर कारवाई करण्यास होते,अशा प्रकारचे ट्विटही सोमय्यांनी केले.

दरम्यान, याप्रकरणी आता महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले असून या स्ट्डीओला महापालिकेच्या पी उत्तर विभागाचे तत्कालिन सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंता यांनी परवानगी दिल्याने या प्रकरणांत महापालिकेने दिलेली परवानगी आणि प्रत्यक्षात केलेले बांधकाम याबाबत चौकशी करण्यासाठी उपायुक्त हर्षद काळे यांच्यावर महापालिका आयुक्तांनी जबाबदारी सोपवली आहे. या चौकशीसाठी जारी केलेल्या नोटीसमध्ये मढ मार्वे येथील एरंगळ भाटी येथे उभारण्यात आलेल्या स्टुडिओमध्ये अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने याच्या बेकायदा आणि अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्याचे निर्देश उपायुक्त हर्षद काळे यांना बजावले आहे. या चौकशीमध्ये या स्टुडिओच्या बांधकामांमध्ये तत्कालिन पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त व सहायक अभियंता दुधारा आणि या विभागातील अन्य अधिकारी यांची भूमिका काय आहे याची चौकशी करायची आहे. शिवाय या बांधकामाला किती परवानगी देण्यात आली आहे? असे किती स्टुडिओ कार्यरत आहेत? जर तात्पुरते बांधकाम करून शुटींग परवानगी दिली असूनही त्यावर पक्के बांधकाम करायला कसे दिले? एमसीझेएमए यांनी कोणत्या प्रकारच्या परवानगी दिल्या होत्या आणि स्टुडिओचे बांधकाम कसे केले? या सर्व स्टुडिओंना अधिकृत परवानगी दिली होती का? सध्याचे जे स्टुडिओ आहेत ते सीआरझे अथवा एनडीझेडमध्ये आहेत का आदी सर्व पैलूंच्या आधारे ही चौकशी करण्याचे निर्देश चहल यांनी उपायुक्त काळे यांना दिले आहे. या चौकशीचा अहवाल पुढील चार आठवड्यांमध्ये सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये कोणाचा हस्तक्षेप किती आहे आणि नियमबाह्य बांधकाम केले आहे किंवा नाही हे या चौकशी अहवालातून समोर येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.