2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक, ठरणार मास्टर प्लॅन

128

भाजपने आतापासूनच 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजपने मेगा प्लॅन तयार केला असून गमावलेल्या जागा पुन्हा जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने मंगळवारी दिल्लीत मोठी बैठक आयोजित केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील भाजप मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भाजपची रणनीती

भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागा थोड्या फरकाने गमावल्या होत्या अशा 144 जागा जिंकण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या जागांची गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून केंद्रीय मंत्र्यांवर या प्रत्येक गटाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. हे मंत्री होणा-या बैठकीत मतदारसंघातील कार्याचा सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

(हेही वाचाः भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र…’ बारामती सुद्धा महाराष्ट्रातच येते, फडणवीसांचे सूचक विधान)

भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरणानंतर भाजपने मिशन महाराष्ट्र देखील आखले आहे. यामध्ये भाजपने लोकसभेतील 48 जागांपैकी 42 जागा जिंकण्यासाठी आराखडा तयार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत देखील सत्तापालट करण्याचा भाजपचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच येत्या मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजप आपली ताकद दाखवून देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.