हिंदू आणि शीख यांच्यात आग लावण्याचे मोठे षडयंत्र भारतात सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून आशिया कपच्या क्रिकेट सामान्यांच्या मालिकेतील ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था लागलीच सक्रिय झाली. एका बाजूला भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानसोबत हा सामना खेळत होता, तर दुसरीकडे ISI ही संस्था दहशतवादी खेळ खेळत होती. त्याला ‘प्रोजेक्ट केरोसीन’ असे नाव देण्यात आले आहे. ज्याचे संपूर्ण टूलकिट खलिस्तान या नावाने चालू आहे आणि त्याचे तीन टप्पे आहेत.
भारताविरुद्ध माहितीचे युद्ध सुरू आहे. हे युद्ध दहशतवादी कारवायांचा मुख्य सूत्रधार असलेल्या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या योजनेनुसार सुरू आहे.
(हेही वाचा 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक, ठरणार मास्टर प्लॅन)
हा सामना जेव्हा सुरु होता तेव्हा आयएसआय ‘प्रोजेक्ट केरोसीन’ चा ‘स्फोट’ घडवून आणण्यासाठी संधीच पाहत होती. सामन्यातील १८व्या षटकात पाकिस्तान फलंदाजी करत असताना ही संधी मिळाली. या सामन्यात खेळपट्टीवर चांगलाच जम बसवलेला आसिफ अलीचा झेल भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंग याने चुकवला आणि पाकिस्तानने सामना जिंकला. त्याच क्षणी आयएसआयची ‘प्रोजेक्ट केरोसीन’ची टूलकिट कार्यान्वित झाली.
काय आहे प्रोजक्ट केरोसीन टूलकिट?
याचे तीन टप्पे आहेत, याचा एकच अजेंडा आहे, भारत आणि जगभरात राहत असलेल्या शीख लोकांमध्ये ‘हिंदू धर्मियांना शीख समुदाय आवडत नाहीत. त्यामुळेच खलिस्तानची निर्मिती शिखांसाठी आवश्यक आहे’, हा विचार वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
1. ISI च्या प्लांटेड हँडल्सद्वारे अर्शदीपवर खलिस्तानी टिप्पणी – इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) च्या प्लांटेड सोशल मीडिया अकाउंटवर कॅच सोडल्याबद्दल अर्शदीप सिंगवर हल्ला करण्यात आला. उजव्या विचारसरणीच्या लोकांना तो शीखविरोधी असल्याचे दाखवणे हा त्याचा उद्देश होता.
(हेही वाचा पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या; दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा?)
2. प्लांटेड हँडल्स ऑफ राईट विंग म्हणत भारतातील प्रसिद्ध डाव्या विचारवंत हँडल्सवर हल्ला – भारतातील प्रसिद्ध सोशल मीडिया हँडल्सवरून अर्शदीप सिंगचा बचाव करताना हिंदूंवर (उजव्या विंग) हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती. यामध्ये हिंदूंना शिखांच्या विरोधात दाखवण्याचा उद्देश आहे. भारतीय नेत्यांचा प्रवेश आणि अर्शदीपला पाठिंबा, ISI प्लांटेड हेडल्सवर हल्ला – अर्शदीपचे समर्थन आणि हिंदू (उजव्या विंग) विचारसरणीच्या हँडलवर भारतातील वरिष्ठ विरोधी नेत्यांचा एक घणाघाती हल्ला असेल.
They said that the Arshdeep episode was purely driven by Pak bots, and have even targeted Zubair for exposing those who called him Khalistani.
But guess who this "paki bot" who abused Arshdeep is followed by – a Minister, a BJP Vice President, and the entire RW ecosystem. pic.twitter.com/JSdIxNPPyo— Yeh Log ! (@yehlog) September 5, 2022
अपप्रचाराच्या विरोधात एफ.आय.आर
या एपिसोडमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते मनजिंदर सिरसा यांनी एफआयआर दाखल केला आहे, मनजिंदर सिंग सिरसा यांनी त्यांच्यावर भारतीय शीखांविरुद्ध द्वेषपूर्ण मोहीम चालवल्याचा आरोप केला आहे. यामध्ये मोहम्मद जुबेरवर पाकिस्तानी कारस्थानाला पाठिंबा असल्याचा आरोप आहे. झुबेरच्या सोशल मीडिया हँडलचे स्क्रीन शॉट्स पाकिस्तानी हँडल्सने वापरल्याचा आरोप सिरसा यांनी केला आहे. खलिस्तानी अजेंडा तयार केल्याप्रकरणी मोहम्मद जुबेरची चौकशी झाली पाहिजे.
Join Our WhatsApp CommunityI have filed a police complaint against @zoo_bear as he was a part of Pak’s conspiracy to defame Sikhs and fuel hate campaign against Sikhs in India. His screenshots are used by Pak handles. I have demanded enquiry into who supported Zubair in creating this “Khalistani” agenda pic.twitter.com/xtc5U5yEsj
— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) September 5, 2022