भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला सोमय्या यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा यांनी सोमवारी मुंबई दौरा करत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावरुन मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती मुंबईत बघितले, असा टोला उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांना लगावला. त्याला आता किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
…गुळाची चव काय?
आपल्याकडे एक म्हण आहे, …. गुळाची चव काय? आता जे निव्वळ नफेखोर आहेत, त्यांना मंगल-अमंगल यातील अंतर कसे कळणार? चिंता करू नका उद्धवजी ज्या क्षणाला तुमचे सरकार गेले, तेव्हा महाराष्ट्र अमंगल पर्वातून मुक्त झाला आणि मंगल पर्व प्रारंभ झाले. गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ, अशा खोचक शब्दांत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंला टोला लगावला आहे.
आपल्याकडे एक म्हण आहे, … गुळाची चव काय?
आता जे निव्वळ नफेखोर आहेत, त्यांना मंगल-अमंगल यातील अंतर कसे कळणार?
चिंता करू नका उद्धवजी ज्या क्षणाला तुमचे सरकार गेले, तेव्हा महाराष्ट्र अमंगल पर्वातून मुक्त झाला आणि मंगल पर्व प्रारंभ झाले.
गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 6, 2022
आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांचा घोटाळा
मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने मढ मार्वेतील 1 कोटी रुपयांच्या स्टुडिओ घोटाळ्याच्या चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 4 आठवड्यांत या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका उपआयुक्त हर्षद काळे यांनी दिले आहेत. ठाकरे सरकारमधील मंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांचा या घोटाळ्याला आशीर्वाद होता हे सिद्ध होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community₹1000 कोटींच्या मढ मार्वे स्टुडिओ घोटाळ्यांची आता मुंबई महानगरपालिकेने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत
उपमहापालिका आयुक्त हर्षद काळेनी 4 आठवड्यात अहवाल सादर करायचा आहे
मला विश्वास आहे ठाकरे सरकारचे मंत्री अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांचा या घोटाळ्याला आशीर्वाद होता सिद्ध होणार pic.twitter.com/BGg0dtszpT
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 6, 2022