कारच्या मागच्या सीटवर बसणा-यालाही आता सीटबेल्ट बंधनकारक- गडकरी

137

केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. गडकरी म्हणाले की, आता कारमध्ये बसणा-या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल, म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणा-यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल.

मागच्या सीटबेल्टलाही अलार्म

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सायरस मिस्त्री यांच्या अपघातामुळे मी ठरवले आहे की, ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म असेल. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, कारच्या मागच्या सीटवरील सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल. मी या संबंधित फाइलवर सही केली आहे, असे गडकरी म्हणाले.

रस्ते अपघातांचा विक्रम

गडकरी म्हणाले की, देशात वर्षभरात 5 लाख रस्ते अपघातांचा विक्रम समोर आला आहे. ते पाहून मला आश्चर्य वाटते. ते म्हणाले की 60 टक्के रस्ते अपघातांमध्ये 18-34 वयोगटातील लोकांचा समावेश आहे.

( हेही वाचा: भाजप-शिंदेंची शिवसेना हिंदुत्ववादी सत्ताधारी, मग मनसे हिंदुंत्ववादी विरोधी पक्ष? )

सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर निर्णय 

टाटा सन्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगाने धावणा-या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणा-या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.