राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सुनावणी पुढे ढकलली आहे. आता यावर 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 27 सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय ने घेण्याचे आदेश दिले आहेत.
( हेही वाचा: दसरा मेळावा ही बाळासाहेबांची परंपरा आणि ती मुख्यमंत्री कायम ठेवणार; केसरकरांचे सूचक वक्तव्य )
मागच्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबली आहे. मंगळवारी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी हे प्रकरण घटनापीठासमोर आले. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाने वकील अॅड. नीरज कौल यांनी निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरुन निवडणूक आयोग पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेईल. त्यानंतर घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले. या सुनावणीत पक्षकारांचे म्हणणे ऐकले जाणार असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community