आयकर विभागाने दिल्ली, यूपीसह देशातील अनेक राज्यांमध्ये 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत निमलष्करी दलाचीही मदत घेण्यात आली आहे. टॅक्स चोरी, राजकीय फंडिंग या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाकडून देशभरात विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई सुरू आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6.30 वाजता अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. नोंदणीकृत बिगर राजकीय पक्षांच्या करचुकवेगिरीशी संबंधित प्रकरणासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! अनुकंपा तत्त्वावर होणारी नियुक्ती बेकायदा)
छत्तीसगडमध्ये दारू व्यावसायिक अमलोक भाटियासह अनेकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दिल्लीपासून, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके पोहोचली असून, चौकशी सुरु आहे. तर मुंबई, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि गुजरातमध्ये हे छापे टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आयकर विभागाने ही मोठी कारवाई करत एकाच वेळी देशात अनेक ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी अनेक व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. त्या प्रकरणातच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशात सुमारे 24 ठिकाणी छापे टाकले आहेत. विभागाच्या पथकाने छत्तीसगडमधील रायपूर आणि रायगडमध्येही वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. येथील करचुकवेगिरीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community