गणेशोत्सवापूर्वी एपीएमसी मार्केटमधील वाढलेले भाज्यांचे दर आता घसरले आहेत. गेले काही दिवस भाज्यांची आवक चांगली होत असून आता भाज्यांचे दर स्थिरावले आहेत. गवार, काकडी, हिरवी मिरची, फ्लॉवर आणि कोबीच्या दरात घसरण झाली आहे तर फरसबीचे दर स्थिर आहेत.
( हेही वाचा : गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग बोटसेवा पूर्ववत; ३ महिन्यांनंतर जलवाहतूक सुरू)
भाज्यांची आवक वाढली असून टोमॅटो आणि भेंडीचे भाव वधारले आहेत. तर इतर भाज्यांचे दर घसरले आहेत. बाजारात सध्या गणेशोत्सवामुळे ग्राहक कमी झाले आहेत अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
घाऊक बाजारातील दर ( रुपये किलोमध्ये)
- कोबी – १२ रुपये
- फ्लॉवर – ३० ते ३२ रुपये
- मिरची – ३६ रुपये
- काकडी – १४ ते १६ रुपये
- भेंडी – २४ ते २६ रुपये
- गवार ४० ते ४४ रुपये
- फरसबी – ५० ते ६० रुपये
- टोमॅटो – २२ ते २४ रुपये
एपीएमसी मार्केटमध्ये सध्या घाऊक भाजीपाला बाजारात ५५० ते ६०० गाडी भाज्यांची आवक होत आहे. ही आवक नियमिक आवकीपेक्षा चांगली आहे. तसेच गणेशोत्सवामुळे जास्त ग्राहक बाजारपेठांमध्ये येत नसल्याने भाज्यांचे दर २० ते ३० टक्के घसरले आहेत.
Join Our WhatsApp Community